breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटमुळे जगाचे 1.36 लाख कोटी डॉलरचे नुकसान, बाजारपेठेत आला चढउतार

वॉशिंग्टन- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे जागतिक स्तरावर परिणाम होतात. याविषयी जगात नेहमीच चर्चा होत असते. या आठवड्यात त्यांच्या एका ट्विटनेही हे पुन्हा दाखवून दिले. ट्रम्प यांनी ट्विट केल्यानंतर जागतिक बाजाराचे जवळजवळ 1.36 लाख कोटी डॉलर बुडाले आहेत. ट्रम्प यांच्या या ट्विटमध्ये फक्त 102 शब्द होते. ट्रम्प यांनी चीनच्या 200 अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर आयात कर वाढवण्याचा इशारा दिला होता, त्यानंतर हा परिणाम पाहायला मिळाला.

जागतिक बाजारात मोठी घसरण
ट्रम्प यांच्या या घोषणेने जागतिक बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. बाजारात अनेक चढउतार आले. शिकागो बोर्ड ऑप्शन एक्सचेंज (CBOE) वोल्टेलिटी एक्सचेंजमध्ये याआधी मागील 2 दिवसांत 50 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. त्यामुळे जानेवारीत पहिल्यांदाच आकडेवारी 20 पर्यंत पोहचली. अशाप्रकारे बाजारात चांगलेच चढउतार आले. आजही सुरुवातीला आशियातील बाजारात घट झालेली दिसली.

चीन-अमेरिकेतील तणाव कायम
ट्रम्प यांच्या या ट्विटनंतर अमेरिका आणि चीनमधील तणाव कमी होण्याच्या सर्वच शक्यता मावळल्या आहेत. दोन्ही देश चर्चेतून योग्य मार्ग काढतील असा विश्वास होता तोपर्यंत जागतिक बाजार स्थिर होता. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन आणि अमेरिकेतील व्यापारासंबंधित चर्चेवर सकारात्मक संकेत दिले होते. ट्रम्प म्हणाले होते, ”चीनचे अधिकारी या आठवड्यात ‘व्यापार करार’ करण्यासाठी अमेरिकेला येत आहेत.” पण, स्थिती सामान्य होण्याची शक्यता असतानाच ट्रम्प यांच्या ट्विटने सर्व शक्यता मावळल्या आणि बाजार कोलमडला. जर ट्रम्प यांनी शुक्रवारपासून चीनच्या 200 अब्ज डॉलर उत्पादनांवर आयात कर 10 वरुन 25 टक्के केला, तर अमेरिका-चीनमधील व्यापारात मोठी घट होईल. याचा परिणाम जागतिक स्तरावरही पाहायला मिळेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button