breaking-newsआंतरराष्टीय

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लेखिकेचा लैंगिक गैरवर्तनाचा आरोप

दोन दशकांपूर्वी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्याशी लैंगिक गैरवर्तन  केले होते, असा  आरोप न्यूयॉर्क येथील लेखिका व महिलाविषयक स्तंभलेखक इ जीन कॅरॉल यांनी केला असून हा आरोप ट्रम्प यांनी फेटाळला आहे. या आरोपांचे वर्णन त्यांनी खोटी बातमी असा केला आहे.

‘व्हॉट डू वुइ नीड मेन फॉर’ या पुस्तकात कॅरॉल यांनी म्हटले आहे की, अध्यक्ष ट्रम्प यांनी न्यूयॉर्क शहरातील बर्गडॉर्फ गुडमन डिपार्टमेंट स्टोअर्समध्ये अध्यक्ष ट्रम्प यांनी लैंगिक गैरवर्तन केले होते. या पुस्तकातील काही भाग एका नियतकालिकाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला होता. कॅरॉल यांनी मुद्रित पुस्तकात ट्रम्प यांचे नाव घेतलेले नाही. पण संकेतस्थळावर मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी २३ वर्षांपूर्वी ड्रेसिंग रूममध्ये आपल्याशी गैरवर्तन केले होते अर्थात माझ्याशी गैरवर्तन करणाऱ्यात ते एकटे पुरूष नाहीत असे कॅरॉल यांनी म्हटले आहे.

नियतकालिकात म्हटले आहे की, कॅरोल यांची बेर्गडॉर्फ गुडमन डिपार्टमेंट स्टोअरमध्ये ट्रम्प यांच्याशी गाठभेट झाली, दोघे एकमेकांना ओळखत होते व त्यांनी सुरुवातीला एकमेकांना ओळख दिली. पण नंतर ट्रम्प एकदम हिंसक झाले व त्यांनी ड्रेसिंग रूममध्ये कॅरॉल यांच्यावर बलात्कार केला.

ज्या सोळा महिलांनी ट्रम्प यांच्यावर जाहीरपणे लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले त्यात कॅरॉल (वय ७५) यांचा समावेश असून २०१६ मधील अध्यक्षीय निवडणुकीवेळी हे आरोप करण्यात आले होते.

‘कॅरॉल यांना कधी भेटलोही नाही!’

ट्रम्प यांनी कॅरॉल यांचे आरोप फेटाळले असून  आपण कॅरॉल यांना कधीही भेटलेलो नाही असे स्पष्ट केले आहे. नवे पुस्तक विकले जावे या हेतूने त्यांनी हे आरोप केले असून त्यांचे हे पुस्तक कल्पनारम्य कादंबरी विभागात विकले जाईल असे ट्रम्प यांनी सांगितले. बर्गडॉर्फ गुडमन स्टोअर्समध्ये या कथित घटनेची कुठलीही चित्रफीत नाही, याचा अर्थ ते घडलेलेच नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button