breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरात नाले सफाई सुरुच ; सोयी-सुविधेअभावी कर्मचा-यांचे आरोग्य धोक्यात

पिंपरी –  दापोडी येथील प्रभाग क्रमांक 30 मधील फुगेवाडी, कासारवाडी व परिसरातील नाल्यांची साफसफाई पावसाच्या तोंडावर अद्याप सुरुच आहे. आज (शुक्रवारी) महापालिकेच्या आरोग्य विभागाकडुन नाले सफाईला सुरूवात  करण्यात आली आहे. दरम्यान, नाले सफाई करताना कर्मचा-यांच्या आरोग्याकडे पालिकेने दुर्लक्ष केले असून त्यांना कोणतीही साधने न दिल्याने हाताने सफाई करावी लागत आहे.

कासारवाडीतील शेवाळे पार्क, दापोडीतील गुलाबनगर, रेल्वेलाईन परिसर, लिंभोरे वस्ती, काटे वस्ती, सिध्दार्थनगर आदि ठिकाणी नाले सफाईचे काम सुरु करण्यात आले आहे. यावेळी नगरसेविका स्वाती (माई) काटे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकार्यांसह कामाची पाहणी केली. आरोग्य अधिकारी सुनील चौहान, आनंद फंड, रवी कांबळे, तानाजी केदारी,  शिल्पा बिडकर, प्रभाग अध्यक्षा उषा पवार आदी उपस्थित होत्या. नाल्यांमध्ये निरुपयोगी गवत, प्लॅस्टिक कागद, कचरा अडकला होता. या अडकलेल्या कचऱ्यांमुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले होते. तसेच विषारी सापांची वर्दळ वाढली होती. पावसाळ्यात नाले तुंबल्याने घरात पाणी शिरण्याचे प्रकार नेहमीच घडतात. त्यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून महापालिकेच्या वतीने  जेसीबीच्या सहाय्याने नाल्यातील वाढलेले गवत, प्लॅस्टिक कचरा काढण्यात आला. नाले स्वच्छ होत नाहीत, तोपर्यंत सफाईचे काम चालु राहणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button