breaking-newsपुणे

डेक्कन परिसरातील मुठा नदीत हात पाय बांधलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला

  • घटनेने खळबळ
  • खून करून मृतदेह विल्हेवाट लावल्याची शक्‍यता
  • मृतदेह शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविला

पुणे – डेक्कन परिसरातील मुठा नदीपात्रात हात पाय बांधलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली. तीचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो नदीपात्रात टाकून दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
डेक्कन परिसरातील संभाजी पूल ते पुना हॉस्पिटल पुल या दरम्यान मुठा नदीपात्रात गुरूवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास नागरिकांना एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्याची माहिती पोलिसांना देताच डेक्कन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे जवानांनी स्थानिक जीवरक्षक राजेश काची, सनी आणि संजय जाधव यांच्या सहकार्याने मृतदेह बाहेर काढला. मृतदेह पोत्यामध्ये टाकला होता. तसेच महिलेचे हात पाय मागील बाजूस बांधलेले असल्याचे दिसून आले. दरम्यान, नदीपात्रात मृतदेह आढळल्याचे समजताच घटनास्थळी मोठ्या संख्येने बघ्यांची गर्दी जमली होती. अनेक दिवसापूर्वी महिलेचा मृतदेह टाकला असून तो कुजला आहे. त्यामुळे तीची ओळख पटविणे पोलिसांना अवघड जात आहे.
महिलेचे वय अंदाजे 30 ते 35 वर्षे एवढे आहे. तसेच तिच्या शरिरावर वार आढळून आले आहेत. तीने नीळसर कुर्ता आणि चॉकलेटी रंगाची लेगिन्स परिधान केलेली आहे. हातात घड्यात तसेच पायात सॅंडलही आहेत. तीच्या डाव्या हातावर संजय असे मराठीत गोंदलेले आहे. तीचे हात पाय बांधलेले होते. त्यामुळे तीचा खून केल्याचे निदर्शनास येत आहे. पोलिसांनी तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठवून दिला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर तीच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

मारेकऱ्यांच्या शोधासाठी तीन पथके रवाना
हे प्रकरण गंभीर आहे. मयत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी तीन पथके रवाना केली आहेत. तिच्या मृत्यूचे कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदनानंतर तिच्या मृत्यूमागचे कारण स्पष्ट होईल. दरम्यान, शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मिसिंग महिला युवतींची माहिती पडताळून पाहिली जात आहे.
-अजय कदम, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डेक्कन पोलीस ठाणे)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button