breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लूबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करा – मारुती भापकर

पिंपरी – डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लूबाबत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व्यापक जनजागृती व योग्य त्या उपाययोजना राबवण्यात याव्यात, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी आयुक्तांकडे केली आहे.

यासंदर्भात आयुक्त श्रावण हार्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात सध्या पावसाळ्याचे वातावरण असून पाऊस चांगला झाल्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचलेले आहे. नाले सफाईचा केवळ फार्स झाल्यामुळे अनेक ठिकाणी नाल्याचे पाणी साचते, तसेच काही भागांमध्ये टायर, नारळाच्या करवंट्या जुनी प्लास्टिकची भांडी, कुंड्या आदी टाकाऊ वस्तूंमधून मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे शहरात डासांचा उपद्रव होत असून ताप येणे, थंडी वाजून येणे, अंग दुखणे, डोके दुखणे आदी साथीच्या आजारांचा फैलाव झपाट्याने होत आहे.

महापालिकेच्या वतीने यापूर्वी धुराडे फवारणी (फॉगिंग), औषध फवारणी, डपक्यांमध्ये ऑईल टाकणे, गप्पी मासे सोडणे आदी उपाययोजना केल्या जात होत्या. त्यावर महापालिका कोट्यावधी रुपयांचा खर्च करत होती. दरवर्षीच्या बजेट प्रमाणे यावर्षीच्या बजेटमध्ये देखील कोट्यावधींची आर्थिक तरतूद असताना धुराडे फवारणी (फॉगिंग), औषध फवारणी, डपक्यांमध्ये ऑईल टाकणे, गप्पी मासे सोडणे आदी उपाय योजना करताना महापालिका दिसत नाही. त्यामुळे सध्याच्या ढगाळ व पावसाळ वातावरणामुळे डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लूचा फैलाव खूप वेगाने शहरात होण्याची शक्यात आहे. म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व्यापक जनजागृती व योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी भापकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button