breaking-newsपुणेमहाराष्ट्र

“डीएसके मोर्टर्स’मधून दरमहा 4 लाख भाडे देऊन शिरीष राहत होता कल्याणीनगर येथील ट्रंम्प टॉवराध्ये

  • त्याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने 5 जुलैपर्यंत केली वाढ

  • फुरसंगी येथील हायब्लीसचे एनसीडीकडे गहाण असलेले 111 फ्लॉट गुंतवणूकदारांच्या परस्पर विकले

पुणे – डीएसके पुत्र शिरीष कुलकर्णी (वय 33, रा. चतृ:श्रृंगी) हा कल्याणीनगर येथील ट्रंम्प टॉवर येथील फ्लॅटमध्ये दरमहा 4 लाख रुपये भाडे देऊन राहत होता. हे भाडे गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेल्या डीएसके मोर्टर्स प्रा.लि. कंपनीमधून देण्यात येत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याच्या पोलीस कोठडीत 5 जुलैपर्यंत वाढ करण्याचा आदेश विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांनी दिला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी 19 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी मुख्य आरोपी दीपक सखाराम कुलकर्णी ऊर्फ डीएसके, पत्नी, हेमंती, मेहुणी अनुराधा रामचंद्र पुरंदरे, पुतणी सई, तिचा नवरा केदार वांजपे, महाराष्ट्र बॅंकेचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्यासह 13 जणांना अटक केली आहे. शिरीष याचा चौदावा नंबर आहे. ठेवीदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिरीष 25 जून रोजी येथील सत्र न्यायालयात शरण आला होता. त्यावेळी त्याला न्यायालयाने 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी आई हेमंती यांच्या खात्यावरून त्याच्या बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या चालू खात्यावर तब्बल 143 कोटी रुपये वर्ग झाले आहेत. याबाबत पोलीस तपासात माहिती देण्यास तो टाळाटाळ करत आहे. तो संचालक असलेल्या डीएसके मोटर्स, डीएसके मोटोव्हिल, तलिस्मान हॉस्पिलिटी सर्व्हिस प्रा.लि. आणि डीएसके शिवाजीन्स फुटबॉल क्‍लब प्रा.लि. या कंपन्यांमध्ये ठेवीदारांकडून गोळा केलेल्या रक्‍कमेपैकी 51 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. त्याने 2011 मध्ये टाकवी बुद्रुक येथे 23 एकर जमिन 36 कोटी रुपयांना विकत घेतली. ही जमिन स्वत:च्याच डीएसके मोटोव्हील या कंपनीला दर महिना 46 लाख रुपये भाड्याने दिली होती. त्याची पत्नी तन्वी हिच्यावरही गुन्हा दाखल आहे. तिच्या खात्यात 12 कोटी रुपये त्याने वर्ग केले आहेत. तन्वी आणि इतर साथीदारांच्या शोधासाठी, तो भागीदार असलेल्या कंपनीने रिझर्व बॅंकेच्या नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे मुदत ठेवी स्विकारल्या आहेत. त्या कंपन्या डी.एस.के.ग्रुप ऑफ पार्टनशिप फर्म या कंपनी ऍक्‍टखाली रजिस्टर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांना मुदत ठेवी स्विकारण्याचा अधिकारच नाही. तो कल्याणीनगर येथील ट्रंम्प टॉवरमध्ये राहत होता. त्यासाठी लागणारे दरमहा 4 लाख रुपये भाडे त्याने डीएसके मोर्टर्स या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेल्या कंपनीतून दिले आहेत. फुरसंगी येथील हायब्लीसचे एनसीडीकडे गहाण असलेले 111 फ्लॉट गुंतवणूकदारांची परवानगी न घेता त्याने विकले आहेत. त्यातून त्याला करोडो रुपये मिळाले आहेत. त्याबाबत तपास करून मूळ पावत्या जप्त करण्यासाठी त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला 5 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button