breaking-newsपुणेमहाराष्ट्र

डीएसकेंच्या दोन कंपन्यांनी 52 कोटींचा व्हॅट बुडविला

  • विक्रीकर विभागाची तक्रार : गुन्हे दाखल

पुणे – बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी यांच्या कंपनीविरुध्द विक्रीकर विभागाच्या तक्रारीनुसार दोन गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये त्यांनी तब्बल 52 कोटी रुपयांचा व्हॅट बुडवल्याचे म्हटले आहे. हे गुन्हे डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड व डीएसके मोटर्स लिमिटेडच्या संचालकांविरुध्द दाखल आहे.

विक्रीकर निरीक्षक गणेश कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डीएसके डेव्हलपर्स लिमिटेडचे संचालक दीपक सखाराम कुलकर्णी, हेमंती कुलकर्णी आणि शिरीष कुलकर्णी यांनी 2006 पासून 2009 पर्यंत संगनमत करुन व्हॅट कराची रक्कम 13 कोटी 6 लाख 99 हजार 503 रुपये विक्रीकर बुडविण्याच्या उद्देशाने शासकीय तिजोरीत भरली नाही. ही रक्कम शासकीय तिजोरीत न भरता वैयक्तीक फायद्याकरीता वापरुन शासनाची दिशाभूल व फसवणूक केली आहे. तर दुसऱ्या एका गुन्ह्यात विक्रीकर निरीक्षक अमोल आहेर (30) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डीएसके मोटर्सच्या संचालकांनी दीपक कुलकणी, हेमंती कुलकर्णी आणी शिरीष कुलकर्णी यांनी व्हॅटची 39 कोटी 19 लाख 43 हजार 297 रुपयांची रक्कम विक्रीकर बुडविण्याच्या उद्देशाने शासकीय तिजोरीत न भरता फसवणूक केल्याचे म्हटले आहे. या तक्रारींमुळे डीएसके दाम्पत्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

गुंतवणूकदारांची करोडो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दीपक कुलकर्णी, हेमंती कुलकर्णी आणि शिरीष कुलकर्णी हे तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. डीएसके दाम्पत्यांविरुध्द तब्बल पाच हजार गुंतवणूकदारांनी फसवणूक केल्याचे तक्रार अर्ज गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाकडे दाखल केले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button