breaking-newsराष्ट्रिय

डिसेंबर 2019 पर्यंत 5G सेवा भारतात येणार ?

मुंबई : इंटरनेटवर डाऊनलोडिंग आणि अपलोडिंग करताचा स्पीड कधी कधी अत्यंत कमी वाटतो. पण दिवसागणिक बदलणाऱ्या टेक्नोलॉजीने त्यावरही उपाय शोधला आहे. येत्या काही दिवसात 5 जीचे निकष निश्चित करण्याचा ट्रायचा प्रयत्न आहे. तसे झाले तर डिसेंबर 2019 पर्यंत भारतात 5 जी सेवा सुरु होऊ शकते.

गुरुवारी मुंबईत झालेल्या 5 जीच्या प्रदर्शनात ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. 4 जी च्या तुलनेत 5 जीचा डाउनलोड स्पीड किमान २० पट ठेवण्याची अट ट्राय ठेवू शकते. 5 जीमुळे दैनंदिन जीवनात कोणते बदल होतील, याचे प्रेझेंटेशन काल मुंबईतल्या हॉटेल लिलामध्ये झाले. नोकीया, इन्टेल, सॅमसंग, जीओ आणि बीएसएनएल या सारख्या दिग्गज कंपन्यांनी यात उत्पादनांचं सादरीकरण केले. शहरी आणि ग्रामीण वाहतुकीच्या समस्येवर 5 जी हे चांगले सोल्युशन असू शकेल, असा विश्वास नोकियाचे भारतातले विपणन प्रमुख अमितकुमार मारवा यांनी यांनी व्यक्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button