breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

डान्सबारची बंदी उठवली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर बंदी घातली – छगन भुजबळ

पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर बंदी आली आणि ज्याच्यावर बंदी होती त्या डान्सबारवरील बंदी उठवली. हे सरकार आणि त्यांचे वकील काय करताहेत अशा संतप्त सवाल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मंचरच्या जाहीर सभेत सरकारला केला.

राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेतील तिसऱ्या टप्प्याच्या सातव्या दिवसातील पहिली सभा पुण्यातील आंबेगावमधील मंचर येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. भुजबळ यांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा भाजप सरकारवर जोरदार प्रहार केला. यावेळी अजित पवार, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, विलास लांडे, रमेश थोरात, प्रदीप गारटकर, जालिंदर कामटे, रोहित पवार आदींसह मंचर, शिरुर, जुन्नर, खेड, आंबेगाव येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले की, आजची ही लढाई मोदी विरुद्ध संविधान अशी सुरु आहे. कुणाला बोलायला, लिहायला बंधने लादली जात आहेत. खरे चित्र मांडायला दिले जात नाही. काल तेलतुंबडे या विद्वान व्यक्तीला अटक करण्यात आली. भाजपचा पदाधिकारी हत्यारासहीत सापडला त्याच्यावर कारवाई नाही. हे काय चाललंय हे लक्षात घ्या. जनावरांना चारा नाही, पाणी नाही शेतकरी मागत आहेत चारा व छावण्या आणि सरकार देतेय डान्सबार आणि लावण्या असा थेट आरोप आमदार छगन भुजबळ यांनी केला.

100 स्मार्ट सिटी बनवतो सांगितले परंतु चार वर्षे होवून गेली एकतरी स्मार्टसिटी बनवली का हे दाखवा असे आव्हान आमदार छगन भुजबळ यांनी सरकारला दिले. गांधींजींच्या पुतळ्याला गोळ्या घातल्या गेल्या. ही कोणती मानसिकता आहे. हे सरकार पुन्हा एकदा मनुवाद आणत आहे असा आरोपही केला. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button