breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डंपर दुकानात घुसला; दोन जण जखमी, झाडाने वाचविला चौघांचा जीव

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महात्मा फुले नगर येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्याने फुलेनगर रस्त्यालगत असलेल्या भंगार दुकानात डंपर घुसल्यामुळे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर डंपर झाडाला धडकल्यामुळे चौघांचा जीव झाडामुळे वाचला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, महात्मा फुले नगर येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कचरा डंपर (क्रमांक एम एच १४ एफ ७९०७) चालकाचे नियंत्रण सुटल्याने फुलेनगर रस्त्यालगत असलेल्या भंगार दुकानात डंपर घुसल्यामुळे या भीषण अपघात झाला. या मध्ये भंगार दुकानातील साबीर शेख (वय ५०) हे गंभीर जखमी झाले आहेत. तर कामगार शाहरुख सय्यद (वय २३) हा देखील या अपघातात जखमी झाला आहे. या घटनेनंतर डंपरचालक याने पळ काढल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

 

झाडामुळे वाचला चौघांचा जीव….

डंपर भंगार दुकानाला धडकून शेजारी असलेल्या चपाती सेंटर समोर असलेल्या झाडाला धडकला. या वेळी चपाती सेंटर मध्ये सावित्री विश्वकर्मा (वय ३०) विकास विश्वकर्मा (वय ११)  शितल बोबडे (वय २८) खुशी बोबडे (वय ४) हे सर्व जण चपाती बनवीत होते. डंपर झाडाला धडकल्यामुळे त्याचा वेग कमी झाल्याने थांबला यामुळे चपाती सेंटर मधील या चौघांचा सुदैवाने जीव वाचला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button