breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

ठाणे हिंसाचारप्रकरणी 36 जणांना अटक

  • अनेक जण परप्रांतीय असल्याचे उघड

  • शिवसेना नगरसेविकेच्या पतीचाही समावेश

ठाणे – ठाण्यातील हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 36 जणांना अटक केली आहे. यामध्ये शिवसेना नगरसेविकेच्या पतीचाही समावेश आहे मराठा मोर्चादरम्यान ठाण्यात बुधवारी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. विशेष म्हणजे यामध्ये अनेक जण परप्रांतीय असल्याचे उघड झाले आहे.

त्याचे व्हिडीओ, सीसीटीव्ही फूटेज आणि फोटोच्या मदतीने हिंसक आंदोलन करणाऱ्यांचा पोलिसांनी शोध घेतला आणि कारवाई केली. हिंसाचार करणाऱ्या अनेक जणांचा मराठा आंदोलनाशी संबंध नसल्याचा दावा पोलीस करत आहेत.ठाण्यातील शिवसेना नगरसेविका निर्मला कणसे यांचे पती शरद कणसे यांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर नौपाडा आणि वागळे इस्टेट पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नौपाडा पोलिसांनी 23 आरोपींना अटक केली असून कापुरबावडी, वर्तकनगर आणि वागळे इस्टेट पोलिसांनी 13 जणांवर कारवाई केली आहे.

दुसरीकडे, नवी मुंबईतील आंदोलनात हिंसा घडवणाऱ्या 56 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कळंबोली, वाशी, कोपरखैरणे आंदोलनातील काही लोकांना नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे यामध्ये अनेक जण परप्रांतीय असल्याचे उघड झाले आहे.

सध्या या भागातील परिस्थिती नियंत्रणात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काही कंपन्यांनी खारघर परिसरात इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत. तसे मेसेज कंपनीने ग्राहकांना पाठवले आहेत.

आणखी एका तरुणाचा बळी 
नवी मुंबईतील कोपरखैरणेमध्ये मराठा क्रांती मोर्चाला लागलेल्या हिंसक वळणामुळे एका तरुणाचा बळी गेला. कोपरखैरणेमध्ये बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास मराठा मोर्चाला हिंसक वळण लागले होते. यावेळी आंदोलकांकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत एक तरुण गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी तरुणाला मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु होते. काल सकाळी त्याने उपचारांना साथ देणे सोडले. त्यानंतर आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास तरुणाने अखेरचा श्वास घेतल्याची माहिती जेजे रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button