breaking-newsताज्या घडामोडीपुणे

ठाकरेंच्या कुलदैवताचं दर्शन घेवून पार्थ पवारांनी केली मावळमध्ये प्रचारास सुरुवात

कार्ला – मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी आज (बुधवारी) कार्ला गडावरील एकविरा देवीचे दर्शन घेतले आहे. त्यानंतर मावळमधील राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांच्या गाठी-भेटी घेण्यास सुरुवात केली.  

यावेळी पार्थ पवार यांच्यासोबत प्रदेश सचिव उमेश पाटील, राष्ट्रवादीचे मावळ तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, गणेश खांडगे, किशोर भेगडे, पुणे युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले आदी उपस्थित होते.

मावळ लोकसभेवर मागील दोन पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेंच वर्चस्व राहिलं आहे. मावळात कार्ला गडावरील एकविरा देवी ही ग्रामदैवत आहे. तसेच ठाकरे घराचं कुलदैवत एकविरा देवी आहे. त्यामुळे शिवसेनेचा प्रचाराचा प्रारंभही एकविरा देवीच्या दर्शनानंतर होतो. याशिवाय रायगड जिल्ह्यात एकविरा देवीवर श्रध्दा असणारा मोठा वर्ग आहे. हे देवस्थान जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. पार्थ पवार यांनी आज सकाळी ९ वाजता कार्ला गडावर जाऊन एकविरा देवीची पूजा करून दर्शन घेतले.त्यानंतर मावळात प्रचारास सुरुवात केली आहे.  

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button