breaking-newsपुणेमहाराष्ट्र

टेम्पोचा दरवाजा वाजल्याने मुलीचा खून

पुणे – ताडीवाला रोड येथे सहा वर्षाची मुलगी गितांजली श्‍याम वाघमारे हिचा खून दारूच्या नशेत एका तरुणाने केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. या आरोपीला शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आरोपी दारु पित असलेल्या टेम्पोचा दरवाजा गितांजली खेळताना वाजवत असल्याचा राग मनात धरून त्याने हा खून केला. गणेश बसवराज गायकवाड (20, रा. ताडीवाला रोड,मूळ रा. गुलबर्गा, कर्नाटक), असे आरोपीचे नाव आहे. गीतांजली बुधवारी रात्री ताडीवाला रोड येथील एका टेम्पोच्या केबीनमध्ये मृतावस्थेत आढळली होती. तिचे कुटुंब चार महिन्यांपूर्वीच शहरात उदरनिर्वाहासाठी आले होते. रस्त्यावरील भंगार गोळा करुन ते उपजिविका करत होते. ताडीवाला रोड येथील पदपथावर ते राहात होते. बुधवारी दुपारी ती पदपथावर खेळत असताना अचानक बेपत्ता झाली होती. बऱ्याचवेळा शोधाशोध केल्यावर ती रात्री साडेनऊच्या सुमारास एका टेम्पोमध्ये मृतावस्थेत आढळली होती. तिच्या गळ्यावर जखमेच्या खुणा होत्या. ससून येथे शवविच्छेदन केल्यावर तिचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर बंडगार्डन पोलिसांनी अज्ञात व्यक्‍तीविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध सुरु केला.
दरम्यान परिसरातील काही नागरिकांनी तिशेवटचे आरोपीजवळ पाहिले होते. त्यानुसार त्याचा माग काढला असता तो मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना आढळला. त्याला ताब्यात घेऊन पोलीसी खाक्‍या दाखवताच त्याने दारुच्या नशेत गीतांजलीचा खून केल्याचे कबूल केले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्‍त रवींद्र सेनगावकर, पोलीस उपायुक्‍त डॉ. प्रवीण मुंडे, सहायक पोलीस आयुक्‍त जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप जमदाडे, पोलीस कर्मचारी फिरोज शेख, संतोष पागार, नवनाथ डांगे व श्रीधर सानप यांच्या पथकाने केली.

आरोपी वडापावच्या गाडीवर काम करणारा
आरोपी गायकवाड हा एका वडापावच्या गाडीवर काम करतो. घटनेच्या दिवशी तो टेम्पोमध्ये दारु पित बसला होता. यावेळी गीतांजली खेळता खेळता टेम्पोचा दरवाजा वाजवत होती तर कधीकधी दरवाजा उघडतही होती. दरवाजाचे लॉक तुटल्याने दरवाजा उघडत होता. याचा राग आरोपीला आल्याने त्याने गीतांजलीने दरवाजा उघडताच तिचा गळा दाबून तिला आत ओढून घेतले. यामध्ये तिचा मृत्यू झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button