breaking-newsराष्ट्रिय

“टूट गयी विकास की डोर, वापस चलो काँग्रेस की ओर”, दिल्ली मुख्यालयासमोर पोस्टरबाजी

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने प्राथमिक मतमोजणीमध्ये चांगली आघाडी घेतली आहे. निवडणुकांचे अंतिम निकाल लागण्याआधीच जागोजागी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानासमोर सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. राहुल गांधींच्या घराबाहेर सकाळपासूनच काँग्रेस कार्यकर्ते हवन करुन काँग्रेसच्या विजयासाठी प्रार्थना करत होते. तर दिल्लीतील दिल्लीत कॉंग्रेस मुख्यालयाच्या बाहेरही मतमोजणी सुरु झाल्यानंतर अवघ्या काही तासात अभिनंदनाचे पोस्टर्स आणि फलक कार्यकर्त्यांनी लावले. या पोस्टर्समध्ये राहुल गांधींना विजयासाठी शुभेच्छा देतानाच भाजपाच्या विकासाच्या दाव्यांवर चिमटा काढण्यात आला आहे. या होर्डींगवर ‘टूट गयी विकास की डोर, वापस चलो काँग्रेस की ओर…’ असे वाक्य लिहीण्यात आले आहे.

आज सकाळपासूनच मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला. राजस्थानमध्ये सचिन पायलेट यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. तर जयपूर, रायपूर आणि वेगवेगळ्या शहरांमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. अनेक कार्यकर्त्यांनी भाजपाच्या धोरणांमुळे व्यापारी तसेच शेतकऱ्यांना फटका बसत असल्याने मतदारांनी काँग्रेसला निडवणून दिल्याचे मत व्यक्त केले आहे. अंतिम निकाल दुपारनंतर समोर येतील मात्र सध्या तरी काँग्रेस तीन्ही राज्यांमध्ये आघाडीवर असल्याचे चित्र दिसत असून हे निकाल म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची वाट भाजपासाठी खडतर करणारे आहेत असे राजकिय विश्लेषकांचे मत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button