breaking-newsआंतरराष्टीय

झिम्बाब्वेच्या अध्यक्षांच्या सभेवेळी स्फोट; उपाध्यक्ष जखमी

बुलावायो – झिम्बाब्वेचे अध्यक्ष इमर्सन मनांगाग्वा यांच्या येथील सभेवेळी स्फोट झाला. या स्फोटातून सुदैवाने मनांगाग्वा बचावले. मात्र, इतर अनेक जण जखमी झाले. जखमींमध्ये झिम्बाब्वेचे उपाध्यक्ष केमो मोहादी यांचा समावेश आहे.
निवडणुकीच्या प्रचारासाठी सत्तारूढ झानू-पीएफ पक्षाने एका स्टेडियममध्ये आयोजित केलेल्या सभेत मनांगाग्वा, मोहादी सहभागी झाले होते. सभा आटोपल्यानंतर मनांगाग्वा व्यासपीठावरून खाली उतरत असताना अचानक स्फोट झाला. त्यामुळे घबराट निर्माण होऊन उपस्थितांनी धावपळ सुरू केली.

स्फोटानंतर मनांगाग्वा यांचा ताफा तातडीने घटनास्थळावरून निघून गेला. जखमींमध्ये उपाध्यक्ष मोहादी यांच्याबरोबरच सत्तारूढ पक्षाच्या दोन पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. स्फोटानंतर सैनिकांनी तातडीने स्टेडियमचा ताबा घेतला. मदत आणि बचाव पथकांनी जखमींना उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात हलवले. सरकारी पातळीवरून स्फोटाबाबतचा तपशील लगेचच देण्यात आला नाही. त्यामुळे व्यासपीठाजवळच झालेल्या स्फोटाचे स्वरूप तातडीने समजू शकले नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button