breaking-newsमनोरंजन
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार लीलावती रुग्णालयात दाखल
मुंबई- ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वास घेण्यात त्रास होत असल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. दिलीप कुमार यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती देण्यात आली आहे.
दिलीप कुमार यांना छातीत दुखू लागल्याने बुधवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास त्यांना वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना सध्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून डिस्चार्जबाबत उद्या निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तसेच यात काही चिंताजनक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.