breaking-newsक्रिडा

#ज्युनिअर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा: सानिका, आरती, आद्य, श्रेयस यांची आगेकूच

पुणे: तेरा वर्षांखालील मुलींच्या गटांत अग्रमानांकित सानिका पाटणकर व द्वितीय मानांकित आरती चौगुले यांनी, तसेच तेरा वर्षांखालील मुलांच्या गटांत अग्रमानांकित आद्य पारसनीस व द्वितीय मानांकित श्रेयस साने यांनी आपापल्या गटांत विजयी सलामी देताना पीएनबी मेटलाईफ ज्युनिअर बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या पुण्यातील स्पर्धेचा पहिला दिवस गाजविला.

रिया शाह, फ्लोरा इंजिनियर, खुशी सिंग, श्रावणी पाटील, ईशा चव्हाण, इशिका गोखे, भूमी वैशंपायन, अनहिता शर्मा, ओजल रजक, आंचल जैन, सिमरन धिंग्रा, आश्‍लेषा मेहता, राधिका पारखी, दोसापती युविका, अंजली तोंडे, कृष्णा काकडे, राशी जैन, श्रेया भोसले, आएशा गांधी, अनुष्का शहापूरकर, सिया रासकर, मृणाल सोनार श्रेया शिंगे व साक्षी दासवेकर या खेळाडूंनीही आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा वेगवेगळ्या शैलीत पराभव करताना तेरा वर्षांखालील मुलींच्या गटात आगेकूच केली.

तसेच पलाश अभ्यंकर, अथर्व रावत, अभिना गर्ग, मयंक राऊत, आदित्य देशमुख ङहर्ष ताम्हनकर, बिनिश सूद, अवधूत कदम, यशवंत साळोखे, ध्रुवांश तलसानिया, विशेष जिवनानी, राजवर्धन सूर्यवंशी, सिद्धांत सिंग, राजस पिंगळे, दर्पणसाने, आदित्य जैन, सार्थक नलावडे, अपूर्व सुभेदार, सिद्धांत ढाळे, रुद्राक्ष खैरनार, सर्वेस यादव, सर्वम कुलकर्णी, यशराज कदम व ओंकार कुलकर्णी या खेळाडूंनीही आकर्षक विजयाची नोंद करताना 13 वर्षांखालील मुलांच्या एकेरीत आगेकूच केली.

चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून चंडीगढ, बंगळूर, कोची, लखनौ, पुणे, मुंबई, कोलकता, हैदराबाद, गुवाहाटी व नवी दिल्ली या दहाही शहरांमधील स्पर्धेतील प्रत्येक गटातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दोन मुलांना नवी दिल्ली येथे 9 व 10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राष्ट्रीय अंतिम फेरीत प्रवेश देण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button