breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जुनी सांगवीत घरफोडी

पिंपरी – बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा सुमारे चार लाख एकोणतीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

जुनी सांगवीतील प्रियदर्शनीनगर येथे सोमवारी (दि. 21) सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसात या वेळेत ही घरफोडी झाली. या प्रकरणी वरूण जैन (वय 30, रा. जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जैन यांचा फ्लॅट सोमवारी सकाळपासून बंद होता. चोरट्यांना त्याचा फायदा घेत, मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 4 लाख 29 हजार रुपयांचा ऐवज घेवून पोबारा केला. सहायक पोलिस निरीक्षक बी. ए. ननवरे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button