breaking-newsआंतरराष्टीय

जी-२०: जपान, अमेरिका आणि भारत म्हणजे ‘जय’- पंतप्रधान नरेंद्र मोदी

ब्यूनर्स आयर्स येथे आयोजित जी-२० शिखर परिषदेत शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या त्रिपक्षीय बैठकीत सहभागी झाले. बैठकीत महत्वाचे जागतिक मुद्दे आणि आव्हानांवर चर्चा झाली. मोदी यांनी एकत्रित मूल्यांवर कार्यरत राहण्यावर जोर देत म्हटले की, ‘जेएआय’ची (जपान, अमेरिका, भारत) बैठक लोकशाहीच्या मूल्यांसाठी समर्पित आहे. ‘जेएआय’चा अर्थ ‘जय’ असा होतो. भारतात जय म्हणजे यश, विजय असा होतो. यातून एक चांगला संदेश जातो, असेही ते म्हणाले. अमेरिका आणि जपान हे आमचे भागीदार असून दोन्ही नेते माझे चांगले मित्र असल्याची पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली.

एम्बेड केलेला व्हिडिओ

ANI

@ANI

#WATCH PM Narendra Modi on meeting US President Trump and Japan PM Shinzo Abe says ‘Both countries are our strategic partners and both leaders are my good friends. Japan, USA, India acronym is JAI, so Jai in India means success. This sends a good message.’ #G20 #Argentina

या त्रिपक्षीय बैठकीदरम्यान ट्रम्प यांनी भारताच्या विकासाचे कौतुक केले. तिन्ही नेत्यांनी संपर्क, स्थायी विकास, दहशतवाद विरोध, समुद्र आणि सायबर सुरक्षेसारख्या जागतिक व बहुपक्षीय हितांच्या सर्व मोठ्या मुद्यांवर तिन्ही देशांच्या सहकार्यावर जोर दिला.

View image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Buenos Aires, Argentina: PM Modi, US President Donald Trump and Japan PM Shinzo Abe meet on the sidelines of the #G20Summi

ही बैठक अशावेळी झाली जेव्हा चीनचा दक्षिण चीन समुद्रात क्षेत्रीय वाद आणि पूर्व चीन समुद्रात जपानबरोबर वाद सुरु आहे. हे दोन्ही क्षेत्र खनिज, तेल आणि इतर नैसर्गिक साधनांनी समृद्ध आहेत.

View image on Twitter

ANI

@ANI

US President Donald Trump on meeting with PM Modi and Japan PM Shinzo Abe: We just had a great meeting. Our relationship is extremely great, strong. It is stronger than ever. We are doing very well together, lot of defence and military purchases. #G20Summit #Argentina

चीन संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर आपला हक्क सांगत आहे. तर व्हिएतनाम, फिलिपाइन्स, मलेशिया, ब्रुनेई आणि तैवान या जलमार्गावर आपला दावा करतात. यामध्ये या समुद्री मार्गाचा समावेश आहे. या मार्गावरुन प्रत्येकवर्षी ३ हजार अब्ज डॉलरचा जागतिक व्यापारी परिवहन होते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button