breaking-newsराष्ट्रिय

जीवे ठार मारण्याचा प्रयत्न : एकाला पोलीस कोठडी

पुणे – वाहनांच्या काचा फोडल्याचा जाब विचारल्याने चिडून एकावर कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणखी एकास पोलिसांनी अटक केली. न्यायाललयाने त्याला 7 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
मेहबुब ऊर्फ सुभानी राजेसाहेब शेख (वय 31, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी यापूर्वी बापु अरुण जानराव, अमोल बापू जानराव (दोघेही रा. अप्पर ओटा बिबवेवाडी) आणि आनंद पांडुरंग असवरे (वय 21, रा. शिवतेजनगर, बिबवेवाडी) या तिघांना अटक करण्यात आली आहे. तिघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे, तर आणखी दोघांवर गुन्हा दाखल आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहे. याबाबत राहुल नवनाथ खंडागळे (वय 33, रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 17 मे रोजी रात्री 8 वाजता बिबवेवाडी येथे घडली. पूर्वी झालेल्या भांडणातून आरोपी आणि त्याचे साथीदार अजय घोडके यांच्या घरासमोर लावलेल्या वाहनांची तोडफोड करीत होते. फियार्दी यांनी त्याबाबत जाब विचारला. त्यावेळी आरोपीने त्यांचावरच कोयत्याने वॉर केले. तसेच पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी शेख याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी फरार साथीदारांच्या आणि प्रकरणाच्या पुढील तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील एस. एम. धुमाळ यांनी केली. ती मागणी न्यायालयाने मंजुर केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button