breaking-newsमनोरंजन

जासूसी केल्यानंतर आलिया बनणार गायिका

बॉक्‍स ऑफीसवर आपल्या “राझी’ चित्रपटाच्या यशस्वीतेनंतर आलिया भट्ट आता गायिका होणार आहे. दिग्दर्शिका अश्‍विनी अय्यर तिवारी यांच्या आगामी “बरेली की बर्फी’ या चित्रपटात आलिया गायिकेची भूमिका साकारणार आहे. याबाबत काही दिवसांपूर्वीच आलियाने होकार दिला असून मी अश्‍विनीच्या आगामी चित्रपटात काम करणार असल्याचे सांगितले आहे. याचे कथानक निखिल मल्होत्रासह अश्‍विनीचे पती आणि निर्माता नितेश तिवारी यांनी लिहिले आहे.

“राझी’मध्ये एका जासूसची दमदार भूमिका साकारल्यानंतर आलिया आता ऑनस्क्रीन गायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. आलियाने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, अश्‍विनीने मला एक खूपच मजेदार कॉन्सेप्ट दिली असून तिच्यासोबत काम करण्यास तयार आहे. ती एक उत्कृष्ट दिग्दर्शिका असून तिच्यासोबत काम करण्यासाठी मी उत्साहीत आहे. कारण आता मला सिरियस भूमिकांपेक्षा वेगळे काहीतरी करण्याची संधी मिळणार आहे. मी आता एक लाइट-हार्टेड चित्रपट करणार आहे.

यापूर्वी आलियाने हम्पटी शर्माच्या दुल्हनियामध्ये “समझावा’, उडता पंजाबमध्ये “एक कुडी’ आणि बद्रीनाथ की दुल्हनियामध्ये “हमसफर’ या गाण्यांना आपला आवाज दिला आहे. मात्र, ती पहिल्यांद पडद्यावर एका गायिकेची भूमिका साकारणार आहे. दरम्यान, आलिया सध्या रणबीर कपूरसोबत “ब्रह्मात्र’ चित्रपटाच्या शूटिंग करत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button