breaking-newsमहाराष्ट्र

जावयाने चक्क सासऱ्याचे नाक कापले : धक्कादायक !

लातूर: बायको माहेरून परत येत नसल्यामुळे वैतागलेल्या जावयाने चक्क सासऱ्याचे नाक कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी लातूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सासऱ्याच्या नाकाचा लचका तोडणाऱ्या या जावयाचा शोध सुरू केला आहे.

लातूरच्या भादा गावात ही घटना घडली. अनेकदा सांगूनही पत्नी माहेरी येत नसल्याने संतोष वैतागला होता. त्यामुळे तो पत्नीला माहेरी आणण्यासाठी भादा येथे आला होता. यावेळी त्याचे आणि त्याचे सासरे नागनाथ शिंदे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे रागाचा पारा चढल्याने संतोषने सासऱ्याच्या नाकाचा लचका तोडला. त्यात नागनाथ शिंदे यांच्या नाकाचा शेंडा तुटला. त्यामुळे घाबरलेल्या संतोषने तिथून पळ काढला. तर नागनाथ यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जावयाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button