breaking-newsमनोरंजन

जाणून घ्या, ‘ठाकरे’ चित्रपटात बाळासाहेबांना ‘आवाज कुणाचा’?

महाराष्ट्राच्या राजकारणातील हुकमी एक्का समजल्या जाणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत ‘ठाकरे’ या चित्रपटाची निर्मिती करत असून सध्या त्याच्या डबिंगचं काम सुरू आहे. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने मराठीतील बाळासाहेबांच्या आवाजासाठी एका मोठ्या कलाकाराची निवड करण्यात आली आहे.

या बायोपिकमध्ये बाळासाहेबांची भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकी साकारत आहे. हिंदीतल्या चित्रपटासाठी त्याचाच आवाज असणार आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार मराठीतील चित्रपटात बाळासाहेबांना अभिनेते सचिन खेडेकर आवाज देणार आहेत. सचिन खेडेकरांनी नुकतंच त्यांचं डबिंग पूर्ण केलं आहे.

 

संजय राऊत यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली असून त्यासाठी त्यांना चार वर्षे लागली. अभिजीत पानसे चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. २३ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या सिक्वलचाही विचार सुरू असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं होतं. ‘बाळासाहेब ठाकरेंचा जीवनप्रवास एका चित्रपटात दाखवू शकत नाही. त्यामुळे या बायोपिकच्या सिक्वलचाही विचार केला असून त्याच्यावरही काम सुरू केलं आहे,’ असं ते म्हणाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button