breaking-newsपुणेमहाराष्ट्र

जलतरण तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या संगणक अभियंत्याचा डोके आपटून मृत्यू

जलतरण तलावात पोहण्यासाठी उतरलेल्या संगणक अभियंता तळाशी असलेल्या फरशीवर डोके आपटून गंभीर जखमी झाल्याची घटना वडगाव शेरी भागातील एका सोसायटीच्या आवारात घडली. उपचारा दरम्यान युवकाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

शाम नितीशकुमार कालरिया (वय २२, रा. हर्मेस हेरिटेज, खराडकरनगर, वडगाव शेरी, मूळ रा. अहमदाबाद, गुजरात) असे मृत्यूमुखी पडलेल्या संगणक अभियंता युवकाचे नाव आहे. शाम मूळचा अहमदाबादचा आहे. तो एका बँकेत नऊ महिन्यांपूर्वी अभियंता म्हणून रुजू झाला. हर्मेस हेरिटेज सोसायटीत शाम आणि त्याचे मित्र भाडेतत्वावर सदनिका घेऊन राहत होते. सोसायटीच्या आवारात छोटा जलतरण तलाव आहे. शाम आणि त्याचे मित्र तलावात पोहण्यासाठी उतरले. त्याने तलावात सुर मारली. तलावात पाण्याची पातळी कमी होती. शाम याच्या निदर्शनास पातळी कमी असल्याचे लक्षात आले नाही. त्यानंतर त्याचे डोके तळाशी असलेल्या फरशीवर आपटले.

गंभीर जखमी झालेल्या शामला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या दहा दिवसांपासून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान शामचा खासगी रुग्णालयात रविवारी रात्री मृत्यू झाला, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे यांनी दिली. त्याच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button