breaking-newsआंतरराष्टीय

जर्मी हंट ब्रिटनचे नवे विदेश मंत्री

लंडन – ब्रिटीश सरकारचे आरोग्य मंत्री जर्मी हंट यांची बोरीस जॉनसन यांच्या जागी नवे परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जॉनसन यांनी सरकारच्या ब्रेक्‍झिट धोरणावरून काल नाट्यपुर्ण रित्या राजीनामा दिला होता. त्यामुळे पंतप्रधान थेरेसा मे यांनी ही नियुक्ती केली.

ब्रेक्‍झिट धोरण म्हणजे ब्रिटनने युरोपियन समुदायातून बाहेर पडण्याचा ब्रिटन सरकारचा निर्णय होय. ब्रिटन सरकारने हा निर्णय घेऊन बरेच दिवस झाले तरी अद्याप त्या निर्णयाचे पडदसाद उमटत आहेत. ब्रिटनचे राजीनामा दिलेले परराष्ट्रमंत्री जॉनसन यांना आपल्या सरकारचा हा निर्णय पसंत नव्हता असे सांगण्यात येते. नवीन विदेश मंत्री नियुक्तीची घोषणा आज अधिकृत अधिसूचनेद्वारे करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button