breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

जम्मू-काश्मीर: चकमकीत ‘लष्कर-ए-तोयबा’चे २ दहशतवादी ठार

नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात ह्यातपुरा येथे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. गेले अनेक तास सुरू असलेली सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमधील चकमच संपली असून जवानांनी दहशतवाद्यांकडून दोन एके-४७ रायफल्स आणि दोन बंदुका जप्त केल्या आहेत.
सीमा सुरक्षा दलाने कंठस्नान घातलेले हे दोन्ही दहशतवादी ‘लष्कर-ए-तोयबा’चे आहेत. याबाबत एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हयातपुरा भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाला मिळाली. त्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवादी लपून बसलेल्या भागाला चारी बाजूंनी वेढा देत शोध मोहिम सुरू केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button