breaking-newsपुणेमहाराष्ट्र

जमिन व्यवहारातील कमिशन न दिल्याने शहा यांचा खून

  • पोलीस तपासात निष्पन्न : दिल्ली येथून अटक केलेल्या छोटा राजनच्या हस्तकाला पोलीस कोठडी

पुणे – बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांच्या खून प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिल्ली येथून अटक केलेल्या छोटा राजनच्या हस्तकाला 30 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश ए. एस. महात्मे यांनी दिला आहे. डत के. अग्रवाल (रा. दिल्ली) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे.

दरम्यान जमीन खरेदी विक्री व्यवहारात शहा यांच्याकडून पंडित यास कमिशनचे 34 लाख रूपये देणे होते. त्यावादातून शहा यांचा आरोपींनी गोळ्या झाडून खून केल्याची माहिती पोलीस तपासातून समोर येत आहे.

पंडित अग्रवाल हा 5 महिन्यापासून फरार होता. गुन्हे शाखेच्या पथकाने इंदौर,मध्यप्रदेश, दिल्ली, उत्तरप्रदेश, छत्तिसगढ आणि गुजरात राज्यात त्याचा शोध घेतला. त्यानंतर दिल्लीतील पहाडगंज भागातील सेंट्रल इन या हॉटेलमधून 19 जुन रोजी ताब्यात घेतले. इस्टेट ब्रोकर म्हणून काम करणारा पंडित हा मागील आठ ते दहा वर्षापासून पुणे शहरात येत होता. जमिन खरेदी व्यवहारात पंडित मध्यस्थीचे कामे करीत. तीन वर्षापूर्वी मुळशीतील धारवली येथील जमीन व्यवहारातून बिल्डर देवेन शहा यांच्याशी पंडित यांचे संबंध आले. त्यानंतर एका जमीन खरेदीमध्ये शहा यांनी पंडित यास 1 कोटी 4 लाख रूपये कमिशन म्हणून द्यायचे ठरले होते. त्यातील 70 लाख रूपये शहा यांनी पंडितला दिले होते. तसेच 34 लाख रूपये बाकी होते. त्यातून शहा यांचा खून केल्याचे प्राथमिक तपासतून उघडकीस आले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त समीर शेख यांच्या नेतृत्वाखालील पथक पंडितकडे तपास करीत आहे. या प्रकरणात शहा यांच्यावर गोळी झाडणारे रवींद्र सदाशिव चोरगे (वय 40, रा. माणिकबाग, सिंहगड रस्ता), राहूल चंद्रकांत शिवतारे (वय 45, रा. वडगाव बुद्रुक) या दोघांसह सुरेंद्र शामकर पाल (वय 36, रा. ठाणे), मुख्य आरोपी सुनील उर्फ सोनु मदनलाला राठोड (वय 34, रा. राजेंद्रनगर, मुळ रा. मध्यप्रदेश), समीर रजनीकांत सदावर्ते (वय 42, रा. शिवतीर्थनगर, कोथरूड) आणि नितीन दशरथ दांगट (वय 36, रा. वारजे) या सहा जणांना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे. सर्वांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) नुसार कारवाई करण्यात आली आहे. सहा जणांच्या चौकशीमध्ये पंडीत अग्रवाल याचे नाव पुढे आले. पंडीत अग्रवाल हा छोटा राजनच्या टोळीतील कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर मुंबईसह मध्यप्रदेशात गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याला अटक करून मोक्का विशेष न्यायालयात हजर केले. त्यावेळी अधिक तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button