breaking-newsआंतरराष्टीय

जपान आणि अमेरिकेतील आण्विक कराराचे नुतनीकरण

टोकियो: जपान आणि अमेरिकेमधील आण्विक कराराचे नुतनीकरण करण्यात आले आहे. जपानमधील प्ल्युटोनियमच्या वाढत्या साठ्याबाबत अमेरिकेने चिंता व्यक्‍त केल्यावर जपानने हे साठे कमी करण्याची तयारी दर्शवली आहे. तब्बल 30 वर्षांपूर्वी म्हणजे 1988 च्या करारानुसार जपानला शांततामय विधायक कार्यासाठी प्ल्युटोनियमचे उत्खनन करण्यास आणि युरेनियमचा साठा करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. या उत्खननासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रामुळे एखाद्या अणूबॉम्बची निर्मितीही जपानला शक्‍य होणार होती. पण तरिही जपानला या कराराद्वारे ही परवानगी दिली गेली होती.
कराराला मुदतवाढ देण्याबाबत कोणीही विनंती केली नसतानाही ही मुदतवाढ दिली गेली. केवळ सहा महिन्यांची पूर्वसूचना दिल्यानंतर हा करार संपुष्टात आणता येऊ शकण्याचा पर्याय मात्र खुला ठेवण्यात आला आहे. या नवीन अटीबाबत अमेरिका अधिक संवेदनशील आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button