breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी, म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये पुरुष करणार वटपोर्णिमा साजरी

पिंपळे गुरवमध्ये मानवी हक्क संरक्षण व जागृतीचा उपक्रम 

पिंपरी – प्रत्येक क्षेत्रात महिला या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने कामे करु लागल्या आहेत. कायद्याने त्यांना समान अधिकार प्रदान केले आहेत. त्यानूसार पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने मानवी हक्क संरक्षण व जागृती संघटनेतर्फे पिंपळे गुरव येथे पुरुष मंडळीकडून वटवृक्षाची मनोभावे पुजा करुन दिर्घ आयुष्य असणा-या वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घालत आम्हीही जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी, हे मागणं मागणार असल्याचे संघटनेचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी सांगितले. 

भारतीय संस्कृतीत वटपोर्णिमेला अनन्य साधारण महत्व आहे. वटपोर्णिमेदिवशी महिला वटवृक्षाची मनोभावे पुजा करुन सात प्रदक्षिणा घालून सुत गुंडाळतात. भारतीय संस्कृतीत सात जन्मी हाच पती मिळावा, म्हणून महिला वटवृक्षाप्रमाणे पतीला दिर्घआयुष्य लाभावे, याकरिता वटपोर्णिमा साजरी करतात. त्यानूसार देशात पुरुष प्रधान संस्कृतीत पुरुषाकडून देखील जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी, याकरिता वटपोर्णिमा साजरी केल्यास काहीही वावगे असणार नाही. 

सामाजिक बांधिलकी समजुन संघटनेच्या वतीने पिंपळे गुरव येथील कांकरिया गॅस गोडाऊन याठिकाणी बुधवारी (दि.27) सकाळी 10 वाजता वटपोर्णिमा साजरी करणार आहेत. यावेळी प्लॅस्टिक न वापरण्याची व पर्यावरण जनजागृतीची नागरिकांना शपथ देण्यात येणार आहे. याप्रसंगी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर, शहर उपाध्यक्ष विकास शहाणे, संगिता जोगदंड, अॅड सचिन काळे, अरुण पवार, अरविंद मांगले, वसंत चकटे, मुरलीधर दळवी, हनुमंत पंडीत, एस.डी.विभुते, दिपक शहाणे, गजानन धाराशिवकर, दत्तात्रय घोरपडे, अदिती निकम, शांताराम पाटील, शिवानंत तालकोटी यांच्यासह अनेक पुरुष, महिला स्वंयफुर्तीने सहभागी होणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button