breaking-newsराष्ट्रिय

छत्तिसगढमधील चकमकीत तीन नक्षलवादी ठार

रायपूर – छत्तिसगढमध्ये आज झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन नक्षलवाद्यांचा खातमा केला. या चकमकीत डिस्ट्रिक्‍ट रिझर्व्ह गार्डचा (डीआरजी) एक जवान जखमी झाला. छत्तिसगढच्या दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात विशेष मोहीम हाती घेतली होती.

जंगलातील या मोहिमेवेळी सुरक्षा पथकाला पाहून नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवून अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक सुरू झाली. त्यामध्ये तीन नक्षलवादी ठार झाले. चकमकस्थळी त्यांचे मृतदेह आढळले. त्यांच्याकडील शस्त्रास्त्रे ताब्यात घेण्यात आली. चकमक झालेल्या जंगलात आणखी नक्षलवादी दडल्याची शक्‍यता असल्याने सुरक्षा पथकाची शोधमोहीम उशीरापर्यंत सुरू होती. तीन नक्षलवाद्यांचा खातमा हे सुरक्षा दलांचे मोठेच यश मानले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button