breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

छञपती संभाजी महाराजाचा 330 वे बलिदान स्मरणदिनी विविध कार्यक्रम, शिरुरचे दोन्ही उमेदवार आमने-सामने

पिंपरी ( महा ई न्यूज ) – वढू ब्रुदूक येथे छञपती संभाजी महाराज यांच्या 330 वे बलिदान स्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शिरुर लोकसभेतील पुणे लोकसभेचे भाजप उमेदवार गिरीश बापट आणि शिरुर लोकसभेतील युतीचे उमेदवार खासदार शिवाजी आढळराव पाटील व राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे हे व्यासपीठ एकत्र आले. याप्रसंगी गिरीश बापट यांनी अमोल कोल्हे यांच्यात गळाभेट झाली तर आढळराव पाटील आणि कोल्हे यांनी एकमेकांना हातात-हात देत समोरसमोर आल्याने दोन्ही उमेदवार एकमेकांना काय बोलले, यावर तर्कविर्तक लढविले जात आहे.

छञपती संभाजी महाराज यांच्या 330 वे बलिदान स्मरणदिनानिमित्त पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्याच्या वढू बुद्रुक याठिकाणी आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपचे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट, शिरुरचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे उपस्थित होते. तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने कार्यकर्त्यामधून एकच चर्चा रंगली होती. याप्रसंगी गिरीश बापट यांनी अमोल कोल्हे यांची गळाभेट घेतली. तसेच अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांचीही गळाभेट घेण्याचा प्रयत्न केला.
सकाळी पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि पुणे ग्रामीण पोलीस आधिक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते शासकीय पूजा संपन्न झाली. मोठ्या संख्येनं शंभू भक्त वढू, तुळापुरात दाखल झाले. निवडणुकीच्या प्रार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीचा आखाडा आता तापायला लागला आहे. शिरूर मतदारसंघामधून शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यात थेट चुरशी सामना होत आहे. उन्हाबरोबर शिरुरचे रान तापायला लागल्याने आज दोन्ही नेत्यांची ऐकमेकांची गळाभेट व हस्तांदोलन करतान कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
यावेळी अमोल कोल्हे म्हणाले की, वढू ब्रुदूक याठिकाणी आलो ते फक्त नतमस्तक होण्यासाठी आलो. निवडणूक असो, नसो याच्याशी काही संबंध नाही. आज जे इतर इतर लोकं भेटले, त्याचा राजकीय काही संबंध नाही. हे स्थान राजकारण विरहीत म्हणून भेटलो, असा खुलासा अमोल कोल्हे यांनी केला.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button