breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

छगन भुजबळ कार्यकर्त्यांशी फेसबुक लाइव्हद्वारे संवाद साधणार ?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ तुरुंगातून बाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांशी फेसबुकद्वारे संवाद साधण्याची शक्यता आहे. सुटकेची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते पहिल्यांदाच सोशल मीडियावर व्यक्त होणार आहेत.

मुंबईत गर्दी टाळण्यासाठी छगन भुजबळांनी फेसबुकचा पर्याय निवडल्याची माहिती समोर येत आहे. छगन भुजबळ त्यांच्या वैयक्तिक फेसबुक अकाऊंटवरुन उद्या फेसबुक लाईव्ह करण्याची शक्यता आहे.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आणि आमदार पंकज भुजबळ यांनी केईएम रुग्णालयात जाऊन छगन भुजबळांची भेट घेतली.

आपल्यावर योग्य पद्धतीने उपचार सुरु असल्याचे भुजबळ यावेळी म्हणाले. त्यामुळे ते पुढील निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणार आहेत. डिस्चार्ज मिळाल्यानंतर अगोदर कुटुंबीयांची भेट घेणार आणि मग कार्यकर्त्यांशी संवाद साधणार, असे भुजबळ यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button