breaking-newsमहाराष्ट्र

चौथ्या जागतिक प्रदर्शनाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन

मुंबई : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज मुंबईत सेवांवरील चौथ्या जागतिक प्रदर्शनाचे उद्‌घाटन केले आणि सेवांमधील 12 चॅम्पियन क्षेत्रांवरील पोर्टल सुरु केले.

यावेळी बोलतांना राष्ट्रपतींनी या जागतिक प्रदर्शनात सहभागी झालेल्या सुमारे 100 देशांमधील 500 प्रतिनिधींचे स्वागत केले. या उपक्रमामुळे भारतीय सेवा क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल आणि जागतिक सेवा क्षेत्राबरोबर भारताचे संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 12 चॅम्पियन क्षेत्रांमुळे भारतीय अर्थव्यवस्था तसेच जागतिक अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान लाभेल आणि रोजगार निर्मिती होईल असे ते म्हणाले.

सेवा क्षेत्र हा जागतिक अर्थव्यवस्थेचा महत्वाचा आणि विस्तारणारा घटक आहे. रोजगार, मूल्यवर्धन, उत्पादकता आणि नवसंशोधन याबाबतीत सेवा क्षेत्राचे आज वर्चस्व आहे, असे राष्ट्रपती म्हणाले. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वेगामुळे कृषी, पायाभूत विकास आणि उत्पादन क्षेत्रातही सेवा क्षेत्राचे महत्वपूर्ण योगदान आहे. सेवा क्षेत्र हे 21व्या शतकातील जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही असे ते म्हणाले.

तळागाळातील 12 कोटी उद्योगांना भांडवल पुरवणाऱ्या आणि बहुतांश सेवा क्षेत्रात उद्यमशीलतेच्या संस्कृतीचे बीज रोवणाऱ्या स्टार्ट अप इंडिया आणि मुद्रा योजनेचा राष्ट्रपतींनी उल्लेख केला. आगामी काळात या स्टार्ट अप्सचे रुपांतर प्रचंड मोठ्या उद्योगांमध्ये होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button