breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चोवीस तासात पवना धरणात सात टक्के पाणीसाठा वाढला

मावळ – पिंपरी चिंचवड शहरासह मावळाची तहान भागविणा-या पवना धरणात चोवीस तासात तब्बल सात टक्के पाणी साठा वाढला आहे.  तर धरण पट्ट्यात 24 तासात 132 मिमी पाऊस पडला आहे. यामध्ये  1 जूनपासून 729 मिमी पाऊस पडला असून सध्यस्थितीत धरणात 31.92 टक्के पाणीसाठा झाला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहरात दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. पवना धरणातून दिवसाला नदीपात्रात 30 ते 35 दक्षलक्ष घनफूट पाणी सोडले जाते. आजमितीला धरणात 31.92 टक्के पाणीसाठा झाला आहे. जून महिन्यात धरण पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पाऊस पडला होता. त्यामुळे शहरवासीयांवर पाणी कपातीचे संकट येण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु, मागील सहा दिवसांपासून या परिसरात पावसाचे प्रमाण वाढले आहे. शहरवासियांना पिण्याचे पाणी देणारा एकमेव स्त्रोत असलेल्या पवना धरणात गेल्या 24 तासात 132 मिमी पाऊस पडला आहे. तर, 1 जूनपासून 729 मिमी पाऊस पडला असून यंदाच्या पावसाळ्यात धरणात 11.76 टक्यांनी धरणातील साठयात वाढ झाली आहे. सध्या धरणात 32 टक्के पाणीसाठा झाला असून हा पाणीसाठा शहराची दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापर्यंत तहान भागविणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button