breaking-newsआंतरराष्टीय

चीन-अमेरिकेतील व्यापारयुद्ध तूर्तास टळले

वॉशिंग्टन : चीनने अमेरिकेच्या अटी मान्य केल्याने दोन्ही देशांदरम्यान सुरू होणारे व्यापारयुद्ध तूर्तास तरी टळले आहे. चीनने व्यापार तूट कमी करण्यासाठी अमेरिकेकडून होणारी आयात वाढविण्यास सहमती दर्शविली आहे. चीन ही व्यापार तूट कमी करत 375 दशलक्ष डॉलर्सवर आणणार आहे. पेटंट कायदा संरक्षणाला अत्यंत महत्त्व देत असल्याचे दोन्ही देशांनी म्हटले आहे.

अमेरिकेत होत असलेल्या दुसऱया टप्प्याच्या चर्चेनंतर दोन्ही देशांकडून एक संयुक्त विधान प्रसिद्ध करण्यात आले. व्यापारयुद्ध न वाढविण्याबद्दल दोन्ही देश सहमत असल्याचे यात नमूद करण्यात आले. तर व्यापार तूट कमी करण्यासाठी चीन अमेरिकेकडून वाढीव आयात करणार असल्याचे म्हटले गेले.

लोकांच्या गरजा पूर्ण करणे आणि उच्च गुणवत्तायुक्त आर्थिक विकासाला बळ देण्यासाठी चीन अमेरिकेच्या सामग्री तसेच सेवांच्या खरेदीत मोठी वाढ करणार आहे. दोन्ही देशांनी अमेरिकेच्या कृषी तसेच ऊर्जा उत्पादनांची निर्यात वाढविण्याबद्दल सहमती व्यक्त केली. याबद्दल पुढील चर्चेसाठी अमेरिका स्वतःचे शिष्टमंडळ चीनला पाठविणार आहे. चिनी शिष्टमंडळाचे नेतृत्व उपाध्यक्ष लियू ही यांनी केले. अमेरिकेच्या अधिकाऱयांमध्ये वित्त सचिव स्टीव्हन म्नूचिन, वाणिज्य सचिव विल्बर रॉस आणि व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लायथायजर यांचा समावेश होता. 100 अब्ज डॉलर्सची व्यापार तूट एक महिन्यात कमी करणे आणि 2020 पर्यंत 200 अब्ज डॉलर्सची व्यापार तूट कमी करण्याचा इशारा अमेरिकेने चीनला दिला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button