breaking-newsआंतरराष्टीय

चीनने दलाई लामांशी थेट चर्चा करावी

अमेरिकेची प्रथमच चीनला जाहीर सूचना 
वॉशिंग्टन – चीनने तिबेटी धर्मगुरू दलाईलामांशी विनाअट थेट चर्चा करावी अशी जाहीर सूचना अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पॉम्पेओ यांनी केली आहे. पॉम्पेओ हे लवकरच चीन दौऱ्यावर जात आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकन खासदारांपुढे बोलताना त्यांनी ही सुचना केली. चीनने दलाई लामांशी सन 2010 पासून आत्ता पर्यंत एकदाही चर्चा केलेली नाही. दोन्ही बाजूंनी एकमेकांशी विधायक चर्चा करून आपल्या समस्यांवर तोडगा काढावा अशी सूचना अमेरिकेन केली असून अशा आपसातील चर्चेला आम्ही नेहमीच पाठिंबा देत असतो असेही त्यांनी म्हटले आहे.

पॉम्पेओ यांनी म्हटले आहे की तिबेट मध्ये मानवाधिकार मुल्यांची जपणूक झाली पाहिजे अशीही अमेरिकेची इच्छा आहे. तेथे धार्मिक स्वातंत्र्य आणि विश्‍वासाचे वातावरण जपले गेले पाहिजे असे ते म्हणाले. हीच भूमिका आपण चीन दौऱ्यात मांडणार आहोत असे सांगून त्यांनी म्हटले आहे की तिबेट मधील राजकीय कैद्यांची चीनने सुटका करावी अशी सूचनाही आपण त्यांना करणार आहोत. पॉम्पेओ उद्याच चीनला रवाना होणार आहेत.

यावेळी ते जागतिक तसेच प्रादेशिक विषयांवरही चीनी नेत्यांशी बोलणार आहेत. तिबटी ऍटोनॉमस रिजनला अमेरिकन पत्रकारांना थेट संपर्क साधता येत नाहीं. त्यामुळे हा प्रदेश अमेरिकन पत्रकारांना खुला करावा असा आग्रह आपण चीनी नेत्यांकडे धरणार आहोत असेही त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button