breaking-newsआंतरराष्टीय

चीनचे पहिले स्वदेशी विमानवाहू जहाज

  • भारतासाठी सावधगिरीचा इशारा

पेईचिंग (चीन) – चीनचे पहिले पूर्णपणे देशी बनावटीचे विमानवाहू जहाज सज्ज झाले आहे. रविवारी हे विमानवाहू जहाज दक्षिण चीन सागरात परीक्षणासाठी उतरवल्याची माहिती चीनच्या सरकारी माध्यमांनी दिली आहे. लिआओनिंग हे चीनचे पहिले विमानवाहू जहाज रशियन बनावटीचे होते. ते सन 2012 मध्ये चीनच्या नौसेनेत सामील झाले. ते अजूनही चिनी नौसेनेत कार्यरत आहे.

परीक्षणासाठी सागरात उतरवण्यात आलेले हे विमानवाहू जहाज 50,000 मॅट्रिक टन वजनाचे आहे. त्यावर 12,000 पेक्षाही अधिक उपकरणे जोडण्यात आलेली आहे. चीनमधील 532 संस्थांनी मिळून ही उपकरणे तयार केलेली आहेत. या विमानवाहू जहाजात 3600 पेक्षाही अधिक केबिन्स आहेत आणि सुमारे 3,000 कर्मचारी काम करत आहेत. मात्र या विमानवाहू जहाजाचे अद्याप नामकरण करण्यात आलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार चीन आपले तिसरे विमानवाहू जहाज तयार करत आहे. सन 2030पर्यंत 4 विमानवाहू जहाजे तयार करण्याची चीनची योजना असल्याची माहिती सरकारी माध्यमांनी दिली आहे. दक्षिण चीन सागराबरोबरच हिंदी महासागरतही ती तैनात करण्यात येणार आहेत. चीन परमाणू विमानवाहक जहाज बनवण्याच्या तयारीत असल्याची माहितीही काही अहवालात देण्यात आली आहे.

जगातील काही मोजक्‍याच देशांकडे विमानवाहू जहाजे असून त्यात भारताचाही समावेश आहे. सर्वाधिक 11 विमानवाहू जहाजे अमेरिकेकडे असून ती सर्व परमाणू शक्तीधारी आहेत.

विमानवाहू जहाजे असलेल्या देशांमध्ये अमेरिका, रशिया, चीन, भारत, फ्रान्स, ब्रिटन, इटली आणि थायलंड या देशांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button