breaking-newsआंतरराष्टीय

चीनचा विरोध डावलून तैवानमध्ये अमेरिकन दूतावासाचे उद्घाटन

तायपे (तैवान) – चीनचा विरोध डावलून अमेरिकेने तैवानमधील आपल्या दूतावासाचे आज उद्घाटन केले. एआयटी (अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ तायपे) नावाच्या नवीन इमारतीत अमेरिकन दूतावास सुरू करण्यात आलेला आहे. एआयटीसाठी सुमारे साडेपंचवीस कोटी डॉलर्स (सुमारे 1718 कोटी रुपये) खर्च आलेला आहे.

तैवानचे राष्ट्रपती साई इंग-वेन यांच्यासह शिक्षण आणि सांस्कृतिक खात्याचे उप मंत्री मेरी रॉयस यांनी अमेरिकन दूतावासाचे उद्घाटन केले. एमआयटी अमेरिका आणि तैवान यांच्यातील अधिक मजबूत संबंधांचे प्रतीक आहे. असे मेरी रॉयस यांनी म्हटले आहे. चालू वर्षी मार्च महिन्यात अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या धोरणात बदल करत आपल्या अधिकाऱ्यांना तैवानला जाण्याची परवानगी दिली होती. तेव्हाही चीनने अमेरिकेला धमकावत आपले चूक सुधारण्यास सांगितले होते.

अमेरिकेने 1979 सालीच चीनला मान्यता देत तैवानबरोबर आपले औपचारिक राजनैतिक संबंध संपुष्टात आणले होते. पण तरीही अमेरिकेने तैवानचा एक महत्त्वाचा भागीदार म्हणून भूमिका बजावली. तैवान हा आपलाच प्रदेश असल्याचे चीन मानत असल्याने एखादा वरिष्ट अमेरिकन अधिकारी तैवानला गेल्यास चीन निषेध व्यक्त करतो.


Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button