breaking-newsआंतरराष्टीय

चीनकडून पाकिस्तानला 500 दशलक्ष डॉलरचे कर्ज

इस्लामाबाद – स्टेट बॅंक ऑफ पाकिस्तानला 500 दशलक्ष डॉलरच्या कर्जास चीनने तयारी दर्शवली आहे. पाकिस्तानातील विदेशी गंगाजळीची स्थिती अनिश्‍चित अवस्थेत असल्यामुळे चीनने हे कर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे. स्टेट बॅंक ऑफ पाकिस्तानने गेल्या पाच वर्षांमध्ये 5 अब्ज डॉलरचे कर्ज घेतले आहे, तरीही विदेशी गंगाजळी अगदी थोडी राहिली आहे.

चीनमधील “पीपल्स बॅंक ऑफ चायना’च्या माध्यमातून चीनच्या विदेशी चलन प्रशासनाकडून पाकिस्तानच्या स्टेट बॅंकेमध्ये जून 2012 साली 500 दशलक्ष डॉलर जमा करण्यात आले होते. या कर्जाची मुदत यावर्षी जून महिन्यात संपत आहे. मात्र तरिही चीनने या कर्जाला आणखी एक वर्षाची मुदत वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे, असे चीनच्या विदेश मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

चीनकडून जमा झालेली रक्कम केवळ ठेवीच्या स्वरुपात पाकिस्तान स्टेट बॅंकेला वापरायची असून त्याबदल्यात केवळ 1 टक्क व्याज आकारले जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button