breaking-newsमनोरंजन

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने केला नावात बदल

बॉलिवूडची फॅशनिस्टा अर्थात अभिनेत्री सोनम कपूरने २०१८ मध्ये उद्योगपती आनंद आहुजासोबत लग्नगाठ बांधली. २०१८ मध्ये लग्न केलेल्या या दोघांच्या लग्नाची प्रचंड चर्चा रंगली होती. अगदी सोनमच्या मेहंदी समारंभापासून ते तिने परिधान केलेल्या लेहंग्यापर्यत. ही चर्चा इथेच न थांबता लग्नानंतर सोनमने तिच्या नावात बदल केलेल्या बदलाचीही चर्चा रंगली होती. सोनमने तिचं नाव बदलून ‘सोनम कपूर आहुजा’ असं केलं होतं. त्यानंतर तिने पुन्हा एकदा तिच्या नावात बदल केला आहे.

नुकताच सोनमचा ‘एक लडकी को देखा’ चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र हा चित्रपट तिकीटबारीवर अपयशी ठरला. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या अपयशानंतर तिच्या पदरात आणखी एक चित्रपट पडला असून या चित्रपटासाठी तिने तिच्या नावात बदल केल्याचं सांगण्यात येत आहे. सोनमने तिच्या नावात बदल करुन ‘झोया सिंग सोलंकी’ असं केलं आहे.

सोनम लवकरच ‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोनमने तिच्या नावात बदल केला आहे. तिने इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर तिच्या नावात बदल करुन झोया सिंग सोलंकी असं केलं आहे. या चित्रपटात सोनमबरोबर दलकीर सलमान स्क्रीन शेअर करणार असून दिग्दर्शनाची जबाबदारी अभिषेक शर्मा यांनी उचलली आहे.

अनुजा चौहान यांच्या बेस्ट सेलरवर हा चित्रपट आधारित आहे.या चित्रपटातून झोया सिंग सोलंकी या राजपूत मुलीची कथा उलगडण्यात येणार असून ती एका जाहिरात कंपनीत काम करते.दरम्यान ती भारतीय क्रिकेट टीमला भेटते आणि २०१० च्या वर्ल्ड कपसाठी लकी चार्म ठरते.

नुकताच सोनमचा ‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा’ प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटात अनिल कपूर, राजकुमार राव आणि जूही चावला मुख्य भूमिकेत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button