पिंपरी / चिंचवड

चिंचवड मतदार संघातील 200 महिलांच्या घरात गॅस कनेक्शन

  • आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते वाटप
  • संजय गांधी निराधार योजना समितीचा पुढाकार

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – थेरगाव येथे 22 व 23 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या शिबीरामध्ये पंतप्रधान उज्वला गॅस कनेक्शन SC/ST प्रवर्गातील महिलांचे अर्ज मागविण्यात आले होते. 255 अर्जदार महिलांपैकी 200 पात्र महिलांना नवीन गॅस कनेक्शनचे वाटप आमदार लक्ष्मण जगताप व संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष नरेंद्र माने यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन संजय गांधी निराधार योजना समिती, चिचंवड विधानसभा समितीचे सदस्य दिलीप गडदे, संजय मराठे, राजेंद्र पाटील, अश्‍विनी तापकीर, अदिती निकम, चैत्राली शिंदे, अध्यक्ष नरेंद्र माने, स्विकृत नगरसेवक गोपाळ माळेकर यांनी केले होते. कार्यक्रमास नगरसेविका सविता खुळे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, बाबासाहेब त्रिभुवन, चंद्रकांत नखाते, रतन गॅस एजन्सीच्या मालकीण डॉ. अनिता कांबळे, अमोल थोरात, चंद्रकांत तापकीर, दिपक जाधव, संतोष जगताप, संजय भोसले, सबिना पवार, मल्हारी तापकीर, कुंदा गडदे, गणेश नखाते, देविदास तांबे आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार जगताप म्हणाले की, केंद्र सरकारच्या मागासवर्गीय समाजातील महिलांकरीता 100 रुपयात गॅस कनेक्शन या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आजपर्यंत भारतात 5 कोटी महिलांना गॅस वाटप करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वामुळे राज्यात हि योजना घराघरात पोहचली आहे, म्हणूनच चिंचवड विधानसभा मतदार संघात ही योजना आम्ही घराघरात पोहचविण्याचे ध्येय संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य गाठत आहेत. सर्व महिला भगिनींनी याचा लाभ घ्यावा. भविष्यात संपुर्ण पिंपरी-चिंचवड शहरात एकही लाभार्थी गॅस कनेक्शन पासून वंचीत राहणार नाही. प्रत्येक गावामध्ये शिबीर भरविण्यात येईल. गॅस कनेक्शन पहिल्यांदाच घरात आल्यामुळे महिलांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता. कार्यक्रमाच्या गॅस वाटपासाठी रहाटणीच्या रतन एन्टरप्राईजेसच्या वतीने सहकार्य करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्विकृत नगरसेवक गोपाळ माळेकर यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button