breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवडच्या मोरे नाटय़गृहाचे नूतनीकरण पूर्ण

  • दुरुस्तीची कामे सुरूच; जागोजागी राडारोडा

पिंपरी – चिंचवडच्या रामकृष्ण मोरे नाटय़गृहाच्या नूतनीकरणाचे काम सहा महिन्यांनंतर पूर्ण झाले. दिवाळी पहाटचे दोन कार्यक्रमही नाटय़गृहात पार पडले. मात्र, बरीच कामे राहिली असल्याने नाटय़गृह पुन्हा काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. १५ नोव्हेंबरपासून महिनाभर राज्य नाटय़ स्पर्धासाठी नाटय़गृहाच्या तारखा राखीव ठेवण्यात आल्याने नाटय़गृह सुरू होऊनही त्याचा प्रत्यक्षात कोणालाही उपयोग होणार नाही.

चिंचवड नाटय़गृहाची दुरवस्था झाल्याचे सांगत एक मे २०१८ पासून नाटय़गृह दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आले. चार महिन्यात काम पूर्ण होईल, असे जाहीर  करण्यात आले. मात्र, तसे झाले नाही. अर्धवट स्वरूपात काम झालेले असताना चार आणि पाच नोव्हेंबरला दिवाळी पहाटचे कार्यक्रम नाटय़गृहात पार पडले. नाटय़गृहातील बरीच कामे करायची राहिली आहेत. जागोजागी राडारोडा पडलेला आहे. अपूर्णावस्थेतही नाटय़गृह सुरू करण्यामागे प्रयोजन काय होते, याचा  उलगडा होऊ शकला नाही. आता मात्र उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी पुन्हा नाटय़गृह बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर, १५ नोव्हेंबरपासून ते पुन्हा सुरू करण्याचे नियोजन आहे. मात्र, सुमारे महिनाभर राज्य नाटय़ स्पर्धासाठी नाटय़गृहाचे आरक्षण आहे.

त्यातून शनिवार व रविवारही वगळण्यात आलेले नाही. त्यामुळे नाटय़गृह सुरू होण्याची प्रतीक्षा असणाऱ्यांचा प्रचंड हिरमोड झाला आहे.

नाटय़गृहाच्या कामकाजात सुरुवातीपासून कोणतेही नियोजन दिसून येत नाही. दुरुस्तीसाठी नाटय़गृह बंद करण्याची घाई करण्यात आली. आता ते सुरू करण्यासाठी दिरंगाई होत आहे. काही तक्रारी वगळता कोणीही नाटय़गृहाच्या नूतनीकरणाची मागणी केली नव्हती. मात्र, तब्बल १८ कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आले. स्थापत्य विभागासाठी १४ कोटी तसेच विद्युत विभागासाठी चार कोटी खर्च दाखवण्यात आला होता. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर इतका खर्च झाला असेल, असे दिसून येत नाही. दिवाळीची सुटी असल्याने या संदर्भात प्रतिक्रियेसाठी कोणीही उपलब्ध होऊ शकले नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button