breaking-newsपिंपरी / चिंचवड

चिंचवडच्या घरातून अपहरण ; उर्से गावच्या माजी सरपंचासह तिघांवर अपहरणाचा गुन्हा

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पैशाच्या व्यवहारातून एका व्यापाऱ्याचे चिंचवड येथील त्याच्या राहत्या घरातून अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यापाऱ्याचे अपहरण शुक्रवारी (दि.७) पहाटे साडेपाचच्या सुमारास चिंचवड येथील इंदिरानगर, शिवकृपा हौसिंग सोसायटी, फ्लॅट नं.६ या त्यांच्या घरातून करण्यात आले.

दीपक कुमार गुप्ता असे अपहरण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी गणेश शंकर पवार (वय ३४, रा. प्रेमलोक पार्क, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, माजी सरपंच राऊत, ठाकूर (दोघेही रा. उर्से, ता. मावळ) आणि कारके या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास  फिर्यादी पवार यांचे मालक दीपक कुमार गुप्ता यांना पैशाच्या व्यवहारातून आरोपी राऊत, ठाकुर आणि कारके यांनी मिळून शिवकृपा हाऊसिंग सोसायटी, इंदिरानगर, चिंचवड येथील त्याच्या राहत्या घरातून अपहरण केले. तसेच जोपर्यंत पैसे देणार नाही तोपर्यंत कोठेही जाऊ देणार नाही, असे सांगून गुप्ता यांना डांबून ठेवले. याप्रकरणी माजी सरपंच राऊत, ठाकूर (दोघेही रा. उर्से, ता. मावळ) आणि कारके त्याच्याविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्यापतरी गुप्ता यांची सुटका करण्यात आलेली नाही. सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित जाधव अधिक तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button