breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चालू बाजारभावाने अंदाजित मुल्यापेक्षा अधिक रक्कम घेवून भंगाराची विक्री करा

विधी समितीचा प्रस्तावाला उपसुचना देवून मान्यता 

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागाकडील जूने, निरुपयोगी साहित्य फेरवापरास अयोग्य आहे. पालिका प्रशासनाने सुमारे दीड कोटी अशी रक्कम निर्धारित केली आहे. त्या भंगार साहित्याची विक्री चालू बाजार भावानूसार काढून भंगार साहित्याचे एकूण अंदाजित मुल्यापेक्षा अधिक रक्कम देणा-या ठेकेदारास थेट पध्दतीने भंगार साहित्याची विक्री करण्यास विधी समितीने मान्यता दिली आहे, अशी माहिती विधी समिती सभापती माधुरी उर्फ मोनाताई कुलकर्णी यांनी दिली. 

महापालिकेच्या विधी समितीची बैठक आज (शुक्रवारी) पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी समिती सदस्य सागर गवळी, राजेंद्र लांडगे, संगिता ताम्हाणे, सुमन पवळे, निकिता कदम, मनिषा पवार, उषा ढोरे उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागाकडे जुने, निरुपयोगी भंगार पडून आहे. सुमारे दीड कोटीचे भंगार निरुपयोगी झाले असून ते फेरवापरास अयोग्य आहे. त्यामुळे महापालिकेने  या भंगाराचा लिलाव करण्याचे ठरविले होते. महापालिकेच्या नेहरुनगर आणि इतर ठिकाणच्या गोडाऊनातील विनावापराचे सुमारे 1 कोटी 35 लाख 89 हजार 860 रूपयांचे भंगार एकत्र करुन ठेवले आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील कलम 79 (क) नुसार महापालिकेच्या कोणत्याही स्थावर किंवा जंगम मालमत्ता विक्री करण्यास महापालिका सभेची मान्यता आवश्यक आहे. याकरिता हा ठराव विधी समितीने उपसुचना देवून मंजूर केला आहे.

प्रस्तावात दिलेले हे मूल्य बाजारभावानुसार अंदाजे देण्यात आलेले आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून केलेल्या कारवाईत हे भंगाराचे साहित्य जप्त केलले आहे. यामध्ये साहित्य, जुने फर्निचर, ई-वेस्ट, हातगाडे यासह अन्य गोष्टींचा समावेश आहे. तसेच भंगाराची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या भंगार विक्रीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये उक्त भंगार साहित्याची विक्री  लिलावाने करण्याएेवजी विभागाकडील चालू बाजारभावाने काढलेल्या भंगार साहित्याचे एकूण अंदाजित मुल्यापेक्षा अधिक रक्कम देणा-या ठेकेदारास थेट पध्दतीने उक्त भंगार साहित्याची विक्री करण्यास मान्यता देवून महासभेकडे शिफारस करण्यात आलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button