breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

चंदा कोच्चर सक्तीच्या रजेवर

 

मुंबई – देशातील आघाडीवरची बॅंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयसीआयसीआय बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोच्चर यांना संचालक मंडळाने अनिश्‍चितकालीन सुट्टीवर जाण्याचे आदेश दिले आहेत. व्यावसायिक भागिदारीसाठी चंदा कोच्चर यांच्या पतीने आयसीआयसीआय बॅंकेकडून कर्ज घेतले होते. करचोरी प्रकरणाचाही आरोप त्यांच्यावर असल्यामुळे हा निर्णय बॅंकेच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचत असल्याचे मानून घेण्यात आला आहे.

व्हिडिओकॉन ग्रुपच्या चेअरमन वेणुगोपाल सोबत पती दीपक कोच्चर यांना व्यावसायिक भागीदारीसाठी कर्ज दिल्याचा आरोप चंदा कोच्चर यांच्यावर आहे. या कर्जवाटपासंबंधीचा खुलासा 2016 मध्ये ऑडिट दरम्यान झाला होता. 2009 सालापासून आयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओ पदावर चंदा कोच्चर कार्यरत आहेत. संचालक मंडळ त्यांच्या कामाने खुश होते. पण 2016 ला झालेल्या गौप्यस्फोटामुळे संचालक मंडळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
बॅंक संचालक मंडळाच्या सदस्यांचे याप्रकरणी सात सदस्यीय चौकशी मंडळ स्थापन केले होते. चंदा कोच्चर यांना त्यांनीच अनिश्‍चितकालीन सुट्टीवर जाण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार सर्वोच्य न्यायालयाच्या माजी न्यायामूर्तीकडून बॅंकेच्या वतीने अंतर्गत चौकशी केली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button