breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

घराणेशाही, मक्तेदारीचा मतदारांनी पराभव केला – खासदार गिरीष बापट

पुणे –  ‘पुणे जिल्हा आता कोणा एकाची मक्तेदारी राहिली नाही,’ असा टोला लगावत भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. ‘बारामतीत दिलेला कौल आम्ही स्वीकारतो. मात्र, मावळमध्ये पार्थ पवारांचा झालेला पराभव हा घराणेशाहीचा, मक्तेदारीचा मतदारांनी केलेला पराभव आहे,’ अशी टीकाही बापट यांनी केली. दरम्यान, पुण्यातील विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच शहरातील सर्व आमदार, तसेच पदाधिकारी आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आहे, असेही बापट म्हणाले.

बापट यांनी दुपारी चारच्या सुमारास कोरेगाव पार्क येथील अन्नधान्य गोदामातील मतमोजणी केंद्रात प्रवेश केला. या वेळी काँग्रेसकडून ‘ईव्हीएम’वर आक्षेप नोंदविल्याने मतमोजणीस उशीर झाला होता. याबाबत प्रतिक्रिया देताना बापट यांनी, नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीप्रमाणे काँग्रेसला निवडून येता येईना त्यामुळे ‘ईव्हीएम’चे साकडे घालण्यात येत असल्याची टीका केली. काँग्रेसकडून पराभवाचे खापर ‘ईव्हीएम’वर फोडणे हा निव्वळ बालिशपणा असल्याचेही ते म्हणाले. आपण किरकोळ कारणांवरून आक्षेप नोंदविणार नाही. कारण ‘कोंबडे झाकले, तरी उगवायचे राहत नाही,’ अशी टीकाही त्यांनी नाव न घेता काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्यावर केली.

देशभरात भाजपला मिळालेल्या यशाबद्दल बापट म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही लाट नसून त्सुनामी आहे. यंदाची निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच लढवली. काँग्रेसने गेल्या ७० वर्षांत देशाची वाट लावली.’ राज्य सरकारच्या योजना आणि विकासकामांचे दाखले देत ते म्हणाले, ‘काँग्रेसच्या काळातील काही योजनाही चांगल्या होत्या. मात्र, त्याची अंमलबजावणी शेवटच्या स्तरापर्यंत झाली नाही.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button