breaking-newsपुणे

घरफोडी प्रकरणात एकाला अटक

पुणे – घराचे कुलूप बनावट चावीने उघडून घरातील 48 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी चंदननगर पोलीसांनी आणखी एकाला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 28 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

शक्तीवेल ऊर्फ सत्वीलकुमार साला (वय 20, मुळ रा. उदयाराज्यापालम, जि. वेलोर. राज्य. तमिळनाडू) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी यापूर्वी श्रीनिवासनकुमार व्यंकटेशकुमार (वय 22, रा. मुळ रा. तमिळनाडू) याला अटक करण्यात आली आहे. शिलवाकुमार (पुर्ण नाव, पत्ता माहित नाही) याच्यावर गुन्हा दाखल आहे. याबाबत प्रदीप रामचंद्र देवकाते (वय 46, रा. वडगावशेरी) यांनी फिर्याद दिली. 3 मे रोजी ही घटना घडली होती.

वडगावशेरी येथील पिनाक सोसायटी येथील रहिवासी देवकाते हे त्यांच्या पत्नीसह शिरूर येथे गेले होते. त्यावेळी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत घराचे कुलूप बनावट चावीच्या सहाय्याने उघडून घरात प्रवेश करत लॅपटॉप, मोबाईल, कॅमेरा, चांदीची भांडी असा 48 हजार 500 रुपयांचा माल चोरून नेल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी सत्वीलकुमार याला अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याच्या फरार साथीदाराचा शोध घेण्यासाठी, त्यांनी अशा स्वरूपाचे इतर गुन्हे केले आहेत का, त्यांचा इतर कोणी साथीदार आहे का, याच्या शोधासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button