breaking-newsपिंपरी / चिंचवड

घनकचरा व्यवस्थापनावर ऑटो क्लस्टरमध्ये प्रदर्शन

पिंपरी –  घनकचरा व्यवस्थापन, तंत्रज्ञानाविषयी व्यावसायिकांसह नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत चिंचवड येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन हॉलमध्ये आजपासून प्रदर्शन भरविण्यात आले आहे. 19 ऑगस्टपर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

पिंपरी महापालिकेमार्फत सर्व गृहनिर्माण संस्था, हॉटेल व्यवसाय, मंगल कार्यालय, खाणावळ, हॉस्टेल, उपाहारगृह, शाळा-महाविद्यालये, भाजी मंडई आणि कृषी बाजार समिती यांच्यात कचरा व्यवस्थापन, तंत्रज्ञानाविषयी जागरूकता वाढविण्यात येत आहे. तसेच नागरिक, व्यावसायिकांमध्ये कच-यावर प्रक्रीया करणे ते पुनर्चक्रण करणे, त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.

त्या अनुषंगाने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेचा उद्देश आणि उद्दिष्टे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याकरिता प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून त्याला आजपासून सुरुवात झाली आहे. 17 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 2018 या कालावधीत सकाळी अकरा ते सात या वेळेत हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

त्याअंतर्गत घनकचरा व्यवस्थापन विषयक कार्यशाळा आणि प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात घनकच-यावर प्रक्रीया करणा-या अनेक नामांकित संस्था सहभागी होणार आहेत. तसेच शहरातील गृहसंकुलातील नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भेट देणार आहेत. या प्रदर्शनामुळे गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक आस्थापनांना ओल्या व सुक्या कच-याची स्थानिक पातळीवर विल्हेवाट लावणे शक्य होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button