breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या 69 व्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. 23) ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘आठवणीतील मुंडेसाहेब’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

चिंचवड येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सायंकाळी पाच वाजता शिवव्याख्याते अशोक बांगर यांचे व्याख्यान होईल. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे उपस्थित राहणार आहेत. तसेच पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे, नगरसेवक केशव घोळवे आणि नगरसेविका योगिता नागरगोजे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या आयोजनात लोकनेते गोपीनाथ मुंडे जयंती कृती समिती पिंपरी चिंचवड, मराठवाडा जनविकास मंच, लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान, गोपीनाथ मुंडे फाऊंडेशन, भगवानबाबा मित्र मंडळ, ब्रम्हचैतन्य फाऊंडेशन, जय भगवान युवा फाऊंडेशन, भगवान सेना, भगवानबाबा युवा मंच, जय भगवान महासंघ, राष्ट्रसंत भगवानबाबा प्रतिष्ठान आदी संस्थांनी सहभाग घेतला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button