breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

गोपीचंद पडळकर यांना ‘वंचित’ची उमेदवारी

सांगली – सांगली लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांना देण्यात आली आहे. याबाबतची घोषणा आज दुपारपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती वंचित आघाडीचे प्रवक्ते अमोल पांढरे यांनी दिली आहे. दरम्यान, गोपीचंद पडळकर बुधवारी सांगलीत अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी त्यांचे राज्यभरातील समर्थक सांगलीत दाखल होणार आहेत. याद्वारे पडळकर आपली शक्ती दाखवून देणार आहेत.

गोपीचंद पडळकर यांनी सोमवारी प्रकाश आंबेडकर यांची नागपूरात जाऊन भेट घेतली होती. यानंतर दोघांत चर्चा झाली. दरम्यान, आंबेडकर यांनीच सांगलीचे उमेदवार जयसिंग तात्या शेंडगे आणि प्रकाश शेंडगे यांच्याशी चर्चा केली. गोपीचंद पडळकर यांनीच प्रस्थापित नेत्यांविरोधात अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केलीच आहे. त्यामुळे आपल्या पक्षाकडून त्यांना तिकीट द्यावे का? अशी विचारणा शेंडगे बंधूंकडे त्यांनी केली. यावर जयसिंग तात्या आणि पडळकर निवडणूक लढल्यास धनगर समाजाची मते विभागली जातील व विरोधकांना त्याचा फायदा होईल असे गणित मांडण्यात आले. त्यानंतर सांगलीतील स्थानिक नेत्यांशी चर्चा करून मंगळवारी पडळकर यांची उमेदवारी जाहीर करू असे आंबेडकरांनी सांगितले.

त्यानुसार आज सांगलीत वंचित बहुजन आघाडीचे नेते एकत्र येणार आहेत. जयसिंग तात्या शेंडगे, प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत सांगलीची उमेदवारी जाहीर करण्यात येईल, असे अमोल पांढरे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button